- वेद आणि उपनिषदांचा सार असलेला ग्रंथ कोणता ? उत्तर : भगवदगीता
- वेदातील आसनाची व्याख्या कोणती ? उत्तर : स्वस्वरूपे समासन्नता
- योगशास्त्राला दर्शनाचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला ? उत्तर : महामुनी पतंजली
- पतंजलींचा काळ कोणता मानला जातो ? उत्तर : इ.स.पूर्व २५०० वर्ष
- योगाचा आद्य प्रवक्ता कोणाला मानले जाते ? उत्तर : सूत्रात्मा हिरण्यगर्भ
- पतंजलींनी योगशास्त्राची सुरुवात कोणत्या सूत्राने केली ? उत्तर : योग- अनु- शासनम
- योगशास्त्राची दोन अंगे कोणती ? उत्तर : वेद आणि योग
- वेदांत दर्शन हे योगाचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : तात्त्विक
- योग हे शास्त्राचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : प्रात्यक्षिक
- यम म्हणजे काय ? उत्तर : समाजात वावरताना पाळावयाची बंधने
- नियम म्हणजे काय ? उत्तर : व्यक्तिगत जीवनात पाळावयाची बंधने
- माणसाने आदर्श जीवनशैली जगावी हे गीतेत कसे सांगितले आहे ? उत्तर : योग कर्मसु कौशल्यम ( आर्ट ऑफ लिव्हिंग )
- योगाचे अंतिम ध्येय कोणते ? उत्तर : योगातून मन घडवणे
- योग संशोधनासाठी लोणावळा येथे कैवल्यधाम ही संस्था कोणी व कधी सुरु केली ? उत्तर : गुरुवर्य कुवलयानंद १९२४
- पातंजल योगसूत्रे किती आहेत ? उत्तर : १९६
- महाराष्ट्रात मान्यता पावलेला व मराठीतील सार्थ , सविवरण पातंजल योगदर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कृष्णाजी केशव कोल्हटकर
- पातंजल योगदर्शनाला राजयोग असे कुणी म्हटले आहे ? उत्तर : स्वामी विवेकानंद
- हठयोग हा राजयोग सिद्धीसाठी शिडीसारखा आहे असे कोणी म्हटले आहे ? उत्तर : स्वात्माराम
- हठयोगामध्ये ह म्हणजे काय ? उत्तर : सूर्य
- ठ म्हणजे काय ? उत्तर : चंद्र
- हठयोग म्हणजे काय ? उत्तर : शरीररूपी विश्वातील सूर्य व चंद्र यांचे संतुलन ठेवणारा मार्ग
Tuesday, October 15, 2019
योगसिद्धांत : भाग २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment