- योगश्चित्त वृत्ती निरोधः = योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय.
- प्रश्न : अंतःकरणाचे घटक किती व कोणते ?
- उत्तर : अंतःकरणाचे चार घटक आहेत. १ ) चित्त, २ ) मन, ३ ) बुद्धी , ४ ) अहंकार
- प्रश्न : चित्ताचे तीन गुण कोणते ?
- उत्तर : १ ) सत्व , २ ) रज , ३ ) तम
- योग म्हणजे काय ?
- उत्तर : चित्तात अव्याहतपणे चालणाऱ्या सात्विक,राजसिक व तामसिक वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग होय.
- निरोध म्हणजे काय ?
- उत्तर : विचारांची मालिका खंडित करणे म्हणजे निरोध होय.
- चित्तवृत्ती निरोधाची अवस्था म्हणजे काय ?
- उत्तर : मनावरील संस्कार,बुद्धी, अहं सर्व काही विलय पावणे व निखळ , निर्मळ , आत्मिक आनंद मिळण्याची अवस्था .
- योग शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली ?
- उत्तर : 'युज' या संस्कृत धातूपासून.
- युज या शब्दाचा अर्थ लिहा .
- उत्तर : जोडणे, एकत्र आणणे , मिलन घडवून आणणे.
- योगशास्त्राचे ध्येय कोणते ?
- उत्तर : आत्मा व परमात्मा यांचे मिलन घडवून आणणे व मनुष्यत्वापासून देवत्वापर्यंतचा घडवणे .
- योगशास्त्राचे दुसरे नाव काय ?
- उत्तर : भारतीय मानसशास्त्र
- मनोकायिक आजार किती टक्के आहेत असे वैद्यकशास्त्र सांगते ?
- उत्तर : ९० ते ९५ %
- २१ व्या शतकात बहुतांश मृत्यू कशामुळे होऊ शकतात असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने मांडले आहे ?
- उत्तर : मनोकायिक आजारांमुळे
- मानसिक ताणतणावाच्या युगात योगशास्त्राचा आधार का महत्त्वाचा ठरत आहे ?
- उत्तर : १ ) आसन , प्राणायाम, ध्यानाच्या अभ्यासाने मानवाला सर्वांगीण येतो. २ ) अपार सुख शांती,समाधान , निरामय शरीर यांची फार मोठी उपलब्धी होते. ३ ) शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमतांचा चांगला विकास होतो. ४ ) एका समग्र व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते.
Monday, October 14, 2019
योग परिचय : भाग १ : योगसिद्धांत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Mast sir
ReplyDelete