- समाधिपाद : ५१ सूत्रे
- साधनपाद : ५५ सूत्रे
- विभूतिपाद : ५६ सूत्रे
- कैवल्यपाद : ३४ सूत्रे
Sunday, October 20, 2019
पतंजल योगदर्शन
- १९६ सूत्रे
- अष्टांग योग
- यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो : अष्टावंगाणी
- योगाने चित्त शुद्धी होते.
- योगेन् चित्तस्य पदेंन वाचा , मलं शरीरश्च वैद्य केनं योपा करोत्तम प्रवरं मुनीनाम , पतंजली प्रांजली रान तोस्मि
- व्याकरणातून वाचा शुद्ध होते.
- चरकसंहिता यात वरील उल्लेख आहे.
- राजा भतृहरी यांनी पतंजली वंदना लिहिली आहे.
व्याख्या : Yoga
- अथ योगानुशासनम
- पतंजली हे स्वतःला श्रेय देत नाहीत.
- स्वयं शिस्त : Knowledge
- योगः चित्तवृत्ती निरोधः
- योगवशिष्ठ नुसार योगाची व्याख्या : मनप्रशमनोपाय उपाय: योग इत्य अभिदियते ।
- रामाला वशिष्ठ ऋषींनी केलेला उपदेश म्हणजे योगवशिष्ठ ग्रंथ
नवीन प्रकार : योगा
- लययोग
- नादयोग
- पॉवर योग
- Rhythmic Yoga
- आर्टिस्टिक योगा
- Acro Yoga
- Yoga - Late ( yoga + pilate )
- Vinyasa Yoga
- Sports Yoga
Saturday, October 19, 2019
योगाचे प्रवाह
- श्री श्री श्री रविशंकर : आर्ट ऑफ लिविंग : सुदर्शन क्रिया
- निर्मलादेवी : सहजयोग
- गोंदवलेकर गुरुजी : शक्तिपात योग
- ब्रम्हाकुमारी : राजयोग
घेरंडसंहिता आणि योगा
- इसवी सन ११ ते १२ : घेरंडसंहिता : घेरंड नावाचा ऋषी
- चण्डकपाली राजा त्यांच्या कडे गेला.
- त्यांनी दिलेला उपदेश व संवाद म्हणजे घेरंडसंहिता .
- यालाच घटस्थ योग असेही म्हणतात. सप्तांग योग
- ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वरी ग्रंथातील ६ वा अध्याय : यामध्ये दुसरे तिसरे नसून राजयोग किंवा अष्टांग योग .
- त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण विश्वात योग प्रसाराचे कार्य केले.
- चारमध्ये विभागणी : राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्ती योग
- राजयोग म्हणजे अष्टांग योग, समाधी
- कर्मयोग : महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील
- ज्ञानयोग : आईन्स्टाईन : सतत अभ्यास करून मानव कल्याणाचा विचार
- भक्तियोग : भक्तिमार्गाचा अवलंब करून श्रद्धा ठेवून कर्म करणे.
स्वस्वरूपे समासन्नता : योगा : विश्लेषण
- युगंधर या कादंबरी चे वाचन करताना पूर्वी वाचलेले आणि आता वाचलेले यातील फरक.
- आपल्यातील बदल आपल्या लक्षात येतात.
- उपनिषदे : यामध्येही वेदांचा उल्लेख आढळतो. तसेच नारदपुराण यामध्येही उल्लेख आढळतो. यामध्ये प्रत्यक्ष यौगिक क्रियांचा उल्लेख
- पतंजली : इसवीसन पूर्व ४ थे ते ५ वे शतक हा कालावधी मनाला जातो.
- योगाची माहिती किंवा साहित्य यांचे संकलन केले.
- पतंजलींनी स्वतःचा एक ग्रंथ लिहिला, त्याचे नाव योगसूत्रम
- यालाच योगदर्शन असेही म्हणतात. याला पतंजल योगदर्शन असा दर्जा प्राप्त झाला.
- १९६ सूत्रांचा हा ग्रंथ आहे. काही ठिकाणी १९५ / १९७ असा उल्लेख आहे.
- भारतीय मानसशास्त्र याचा पाया मानला जातो.
- डॉ . अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ' मनात ' हे पुस्तक जरूर वाचा.
- १९६ : पतंजल योगदर्शन : यालाच अष्टांग योग असे म्हणतात.
- इसवी सन ११ ते १२ : हठप्रदिपिका याचे ग्रंथकार : स्वात्माराम
- यालाच चतुरंग योग असेही म्हणतात.
योगा नोटस : २० ऑक्टोबरचा रविवार : मार्गदर्शक : डॉ . वसुधा मोरे
- तीन ओंकाराचा जप
- प्रार्थना : योगेन चित्तस्य
- योगशिक्षक अभ्यासक्रमासाठी : तीन बुकलेट्स मिळाली. वही, पेन सुद्धा
- आयुष , गुरुकुल, पॉवर योगा
- ३० ते ५० % अभ्यासक्रम YCMOU असतो.
- भगवद्गीतेचे सार विचारू शकतात.
- कर्म, अकर्म, विकर्म
- concepts क्लिअर हव्यात.
- पतंजली योगसूत्रांचा अधिक अभ्यास करा.
- QCI साठी MCQ type questions असतात.
- योग म्हणजे काय ? Goal ... स्वस्वरूपे समासन्नता
- सेल्फ consciousness
- युज या संस्कृत धातूपासून योगा हा शब्द तयार झाला.
- युज म्हणजे जोडणे.
- युज्यते अनेन इति योगः
- वेद : सर्वात प्राचीन असून ते अपौरुषेय आहेत असे मानले जाते.
- व्यासांनी त्यांचे संकलन केले.
- त्यांचे चार प्रकारांमध्ये विभाजन केले.
- ऋग्वेद , सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद
Tuesday, October 15, 2019
योगसिद्धांत : भाग २
- वेद आणि उपनिषदांचा सार असलेला ग्रंथ कोणता ? उत्तर : भगवदगीता
- वेदातील आसनाची व्याख्या कोणती ? उत्तर : स्वस्वरूपे समासन्नता
- योगशास्त्राला दर्शनाचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला ? उत्तर : महामुनी पतंजली
- पतंजलींचा काळ कोणता मानला जातो ? उत्तर : इ.स.पूर्व २५०० वर्ष
- योगाचा आद्य प्रवक्ता कोणाला मानले जाते ? उत्तर : सूत्रात्मा हिरण्यगर्भ
- पतंजलींनी योगशास्त्राची सुरुवात कोणत्या सूत्राने केली ? उत्तर : योग- अनु- शासनम
- योगशास्त्राची दोन अंगे कोणती ? उत्तर : वेद आणि योग
- वेदांत दर्शन हे योगाचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : तात्त्विक
- योग हे शास्त्राचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : प्रात्यक्षिक
- यम म्हणजे काय ? उत्तर : समाजात वावरताना पाळावयाची बंधने
- नियम म्हणजे काय ? उत्तर : व्यक्तिगत जीवनात पाळावयाची बंधने
- माणसाने आदर्श जीवनशैली जगावी हे गीतेत कसे सांगितले आहे ? उत्तर : योग कर्मसु कौशल्यम ( आर्ट ऑफ लिव्हिंग )
- योगाचे अंतिम ध्येय कोणते ? उत्तर : योगातून मन घडवणे
- योग संशोधनासाठी लोणावळा येथे कैवल्यधाम ही संस्था कोणी व कधी सुरु केली ? उत्तर : गुरुवर्य कुवलयानंद १९२४
- पातंजल योगसूत्रे किती आहेत ? उत्तर : १९६
- महाराष्ट्रात मान्यता पावलेला व मराठीतील सार्थ , सविवरण पातंजल योगदर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कृष्णाजी केशव कोल्हटकर
- पातंजल योगदर्शनाला राजयोग असे कुणी म्हटले आहे ? उत्तर : स्वामी विवेकानंद
- हठयोग हा राजयोग सिद्धीसाठी शिडीसारखा आहे असे कोणी म्हटले आहे ? उत्तर : स्वात्माराम
- हठयोगामध्ये ह म्हणजे काय ? उत्तर : सूर्य
- ठ म्हणजे काय ? उत्तर : चंद्र
- हठयोग म्हणजे काय ? उत्तर : शरीररूपी विश्वातील सूर्य व चंद्र यांचे संतुलन ठेवणारा मार्ग
Monday, October 14, 2019
योग परिचय : भाग १ : योगसिद्धांत
- योगश्चित्त वृत्ती निरोधः = योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय.
- प्रश्न : अंतःकरणाचे घटक किती व कोणते ?
- उत्तर : अंतःकरणाचे चार घटक आहेत. १ ) चित्त, २ ) मन, ३ ) बुद्धी , ४ ) अहंकार
- प्रश्न : चित्ताचे तीन गुण कोणते ?
- उत्तर : १ ) सत्व , २ ) रज , ३ ) तम
- योग म्हणजे काय ?
- उत्तर : चित्तात अव्याहतपणे चालणाऱ्या सात्विक,राजसिक व तामसिक वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग होय.
- निरोध म्हणजे काय ?
- उत्तर : विचारांची मालिका खंडित करणे म्हणजे निरोध होय.
- चित्तवृत्ती निरोधाची अवस्था म्हणजे काय ?
- उत्तर : मनावरील संस्कार,बुद्धी, अहं सर्व काही विलय पावणे व निखळ , निर्मळ , आत्मिक आनंद मिळण्याची अवस्था .
- योग शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली ?
- उत्तर : 'युज' या संस्कृत धातूपासून.
- युज या शब्दाचा अर्थ लिहा .
- उत्तर : जोडणे, एकत्र आणणे , मिलन घडवून आणणे.
- योगशास्त्राचे ध्येय कोणते ?
- उत्तर : आत्मा व परमात्मा यांचे मिलन घडवून आणणे व मनुष्यत्वापासून देवत्वापर्यंतचा घडवणे .
- योगशास्त्राचे दुसरे नाव काय ?
- उत्तर : भारतीय मानसशास्त्र
- मनोकायिक आजार किती टक्के आहेत असे वैद्यकशास्त्र सांगते ?
- उत्तर : ९० ते ९५ %
- २१ व्या शतकात बहुतांश मृत्यू कशामुळे होऊ शकतात असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने मांडले आहे ?
- उत्तर : मनोकायिक आजारांमुळे
- मानसिक ताणतणावाच्या युगात योगशास्त्राचा आधार का महत्त्वाचा ठरत आहे ?
- उत्तर : १ ) आसन , प्राणायाम, ध्यानाच्या अभ्यासाने मानवाला सर्वांगीण येतो. २ ) अपार सुख शांती,समाधान , निरामय शरीर यांची फार मोठी उपलब्धी होते. ३ ) शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमतांचा चांगला विकास होतो. ४ ) एका समग्र व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते.
Subscribe to:
Posts (Atom)